Letter from a friend
1 min read

Letter from a friend

Letter from a friend

(If you follow Marathi, skip my translation and scroll to the bottom)

12/11/2008, Wed, 10:00am

Dear Sumeru,

I have always been concerned about your health, ever since you were a little baby. You’re a grown-up now, grown up enough to identify the good and the bad. How have you reached the conclusion, that your body needs no exercising but only cigarettes? I don't mean to demand answers of you.

The way in which terrorists and caste divisions ruin a country’s health, similarly, an individual’s physical health is ruined by his bad habits and vices.

As my son I have a sincere expectation of you. The money that we, your parents, have worked hard to earn and send you for the purpose of your health and your education; you must try and ensure that it is not misused. You ought to have this consciousness. You must think, just because I send you money I say all this, but that is certainly not the case. And it also doesn’t mean, that you are free to do as you please with your own money. Money must be spent well. Especially now that you are away from us, you have a bigger responsibility. “Even without his parents around, look how responsible he is.”–one must feel this naturally, when they see you.

Generally speaking, a vice is not as easy to quit as easy it is to take up; whether good or bad. And it is indeed during one’s youth, that one can go adrift. Youth does not like restrictions, discipline or a rut. And hence, a lot of importance has been given to one's youth.

It is but natural that we, as your parents, feel like your health must be in its best condition. We can only have this expectation, not make a demand. Try to quit smoking. I’m sure you will succeed one day. We will pray that your efforts find success.

Your friend,

Dad


१२/११/२००८, बुध, 10:00am

प्रिय सुमेरू,

तुझ्या प्रकृतीची मला नेहमीच काळजी वाटत असते, अगदी तू लहान असल्यापासून. तू आता मोठा झालेला आहेस, चांगले काय वाईट काय हे ओळखण्या इतका. तुझ्या शरीराला व्यायामाची गरज नाही तर सिगरेटच गरज आहे, हे तू कसे काय ठरवले आहेस? या प्रश्नाचे मी उत्तर मागत नाही.

देशाचे स्वास्थ्य जसे टेररिस्ट आणि जातीय शक्ती बिघडवितात, तसेच व्यक्तीचे शरीर स्वास्थ्य त्याच्या वाईट सवयी, व्यसने बिघडवितात.

माझा मुलगा म्हणून माझी तुझ्याकडून प्रामाणिक अपेक्षा आहे. आपल्या आईवडिलांचा कष्टाने मिळविलेला पैसा, जो आपला शिक्षण आणि स्वास्थ्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचतो, त्याचा शक्यतो दुरुपयोग होऊ देऊ नये. एवढी संवेदना (sensitivity) तुझ्यात असायलाच हवी. तू म्हणशील मी पैसे पाठवतोय म्हणून बोलतोय, तर तसे मुळीच नाही. आणि याचा अर्थ असाही नाही की तुझ्या पैशात तू काहीही करायला मोकळा आहेस. पैशाचा सदुपयोग महत्त्वाचा. आमच्यापासून दूर राहते वेळी तुझी जबाबदारी जास्त आहे. 'आई-वडील जवळ नसताना देखील तो पहा मुलगा कसा जबाबदारीने वागतो आहे' असे सहज उद्गार (reaction) कोणाचेही निघायला हवेत.

कोणतेही व्यसन सहजासहजी, जसे पटकन लागते तसे सुटत नाही. मग ते चांगले असो वा वाईट. आणि वाटा चुकण्याचे तारुण्य हेच वय असते. तारुण्याला बंधने, शिस्त, चाकोरी मान्य नसते. आणि म्हणूनच माणसाच्या आयुष्यात तारुण्याला फार महत्त्व दिलेले आहे.

तुझी प्रकृती चांगली असावी पालक म्हणून आम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. आम्ही अपेक्षा करू शकतो, डिमांड नाही. सीगरेट सोडण्याचा प्रयत्न कर. तुला एक दिवशी जरूर यश मिळेल. तुझ्या प्रयत्नाला यश मिळावे अशी आम्ही प्रार्थना करतो.

तुझा मित्र,

बाबा